Home सामाजिक भद्रावतीत आज शिवसेना (उबाठा) पक्षाची वरोरा विधानसभा आढावा सभा

भद्रावतीत आज शिवसेना (उबाठा) पक्षाची वरोरा विधानसभा आढावा सभा

1327

 भद्रावती : भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात शिवसेना (उबाठा) पक्षाची  वरोरा-भद्रावती विधानसभा आढावा सभा दि. १९ सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

.       या सभेत प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशो पेंडणेकर, राज्य महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखा राऊत, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे,  संपर्क संघटिका सोनाली म्हात्रे, पक्ष निरीक्षक शालिनी सावंत आणि निधी शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनी भावे आणि पुर्व विदर्भ युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य गोडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रा. निलेश बेलखेडे उपस्थित राहतील. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र) यांची प्रमुख उपस्थिती राहतील.

.       सदर आढावा सभेला ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला आघाडी आणि युवा सेनेचे समस्त शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनींनी फार मोठ्या संखेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे संयुक्त आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र), महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा संघटीका माया नारळे, भद्रावती तालुका संघटिका आशा ताजने, वरोरा तालुका संघटिका सरला मालोकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा जीवतोडे भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पना टोंगे, भद्रावती शहर सघंटीका माया टेकाम, वरोरा शहर सघंटीका शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, वर्षा ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने तसेच चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!