नेरी : सिरपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सिरपूर, गोरवठ, लोहारा, नवतळा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण तथा नवीन सभागृहाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 16 सप्टेंबर ला संपन्न झाले सदर विकास कामे ही जनसुविधा, आमदार निधी तसेच 2515 च्या खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आले असून मोठया उत्साहात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
. भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला आ. बंटी भांगडिया यांचे ढोल, ताश्या, लेझीम पथक व काठी च्या निनादात पुष्प उधळीत आमदार साहेबांचे औक्षन करीत जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. सिरपूर येथील माळी समाज व ढीवर समाज सामजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले तर खनिज विकास निधीतील सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यानंतर गोरवठ येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर लोहारा येथील सामाजिक सभागृहचे भूमिपूजन व ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातील भाजपा बूथ समिती कार्यकर्ते नेते मंडळी पदाधिकारी ग्रा प सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तमुस अध्यक्ष व महिला पुरुष गावकरी समाज बांधव उपस्थित होते.
. या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते डॉ श्यामजी हटवादे, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम डुकरे, कमलाकर लोणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे, युवा नेते समीर राचलवार, सरपंच दिक्षा पाटील, उपसरपंच गीता जाभूळे, भाजप जिप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस ममता डुकरे, तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, माजी उपसभापती विलास कोराम, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, सुधीर पोहनकर, तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, हर्षल डुकरे, नितेश दोडके, अविनाश सोनवाने, गजानन जाभूळे, प्रणय हनवते, जगदीश जाभूळे, नरेंद्र हजारे, मनी रॉय, शैलेश पाटील, महादेव कोकोडे, आशा मेश्राम, दिवाकर डहारे, राजू बोरकर, गोसाई जिवतोडे, सुधाकर खेडकर, प्रकाश वसाके उपस्थित होते.


