बाजार गणेश मंडळ मुल च्या वतीने बैल पोळ्याचे आयोजन

19

मुल : शहरातील गुजरी चौकातील बैल पोळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे, मागील वर्षी पासून स्थानिक बाजार चौक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोट्या स्वरूपात बैल पोळ्याचे आयोजन सुरू केले आहे, या वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी घेऊन स्पर्धकांच्या रुपात सहभाग नोंदविला, स्पर्धेत चुरस बघायला मिळाली, प्रथम बक्षिसासाठी दोन स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने ईश्वर चिठी टाकण्यात आली, त्यात प्रथम क्रमांक मनोज बोर्डावार याच्या जोडीला देण्यात आला तर द्वितीय क्रमांक मयूर कावळे याच्या जोडीने पटकाविला.

.       प्रथम क्रमांक प्राप्त मनोज बोर्डावार याच्या जोडीला स्व. भावनाताई टहलियानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नातंवंडांकडून रोख रु 5001 व शिल्ड देण्यात आली तर द्वितीय क्रमांक प्राप्त मयूर कावळे याच्या जोडीला माजी नप सभापती प्रशांत समर्थ यांच्या सौजन्याने रोख रु 3001 व शिल्ड देण्यात आले.तृतीय क्रमांक प्राप्त पंकज आगळे यांना माजी नप उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांचे कडून रोख रु 2001 व शिल्ड देण्यात आली, चतुर्थ क्रमांक मारोती कावळे यांना मिळाला, त्यांना रवींद्र बोकारे यांच्या सौजन्याने रोख रु 1001 व शिल्ड देण्यात आले.पाच ते आठ क्रमांकाचे पुरस्कार अनुक्रमे गणेश बुटले, मनोज कावळे, गनेश शेरकी, मधुकर गुरनुले यांना देण्यात आले, या पुरस्कार प्राप्त प्रत्येक शेतकऱ्यांना ना. सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतीने चामडी बॅग व शिल्ड देण्यात आले. परीक्षक म्हणून प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी व प्रा.सुधीर नागोसे यांनी काम पाहीले.

.       यावेळी भाजप नगर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नपरपरिषद उपाध्यक्ष मोतीलाल टाहलियानी, प्रवीण मोहुर्ले, माजी नप बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगर महामंत्री चंद्रकांत आष्टनकर, किशोर कापगते, रिंकू मांदाडे, संजय मारकवार, ऍड बल्लू नागोसे, प्रमोद कोकूलवार, प्रवीण मोहुर्ले यांची समारंभाला विशेष उपस्थिती होती, मंडळाचे सदस्य सर्वश्री प्रेषित निकोडे, यश बोकारे, तन्मय संतोषवार,वैभव निकुरे, विक्की रामटेके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.