Home सामाजिक कोटगांव येथें तान्हा पोळा साजरा

कोटगांव येथें तान्हा पोळा साजरा

1451

नागभीड : नागभीड तालुक्यातील कोटगांव येथें दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहाने चिमुकले बालगोपाल तान्हा पोळ्यात भाग घेतात. कोटगांव हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येतो. कोटगांव येथें विविध उपक्रम राबविल्या जातात. असाच तान्हा पोळा हा उपक्रम गेल्या 25 वर्षपासून येथें राबविल्या जाते.

.       कोटगांव वासीय नागरिक स्वतः वर्गणी करून बालगोपालांना भेट देतात. लहान मुले घरोघरी जाऊन भेट स्वीकारतात. त्यापेक्षा गावकरी चंदा गोळा करून बालगोपालांना भेट म्हणून काही रोख रक्कम व खाऊ देतात. या उपक्रमाला जवळजवळ 25 वर्ष होत आहेत. या उपक्रमात जवळजवळ 135 बालगोपालांनी भाग घेतला होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिक उत्सपूर्त सहभाग घेतात व उपक्रमाला मदत करतात.

error: Content is protected !!