- ग्रामसभेत निवडणूक घेऊन केली अध्यक्ष ची निवड
प्रतिनिधी नेरी,
नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथे दि25 ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात येऊन तमुस अध्यक्ष पदाचा विषय घेण्यात आला यात बहुमताने अविरोध अमित लक्षण शिवरकर यांची निवड करण्यात आली
मोटेगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यात अनेक नागरिकांनी भाग घेतला अनेक विषयांवर चर्चा करून विकास कामावर रंगतदार चर्चा झाली यानंतर अध्यक्ष च्या परवानगी ने तमुस अध्यक्ष पदाचा विषय घेण्यात आला आणि रीतसर अध्यक्षपदासाठी नावे मागविण्यात आले यावेळी सर्वानुमते चंद्रशेखर नान्हे यांचे नाव देण्यात आले मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव न आल्याने अविरोध नान्हे यांची तमुस अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक वाघमारे मॅडम सरपंच सुभाष नेवारे उपसरपंच चंद्रभान रामटेके विलास कोराम माजी सभापती गोकुळ दडमल घनश्याम इंगुलकर सुशीला खोब्रागडे माधुरी भाणारकर जयदत्त खोब्रागडे अक्षय रामटेके रवींद्र सुकारे अमित पाटील अतुल बोरकर शरद मानकर आर एम वाघमारे कामडी साहेब आदींसह संपूर्ण ग्रा प पदाधिकारी गावकरी महिला पुरुष उपस्थित होते नवनियुक्त तमुस अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या


