- पळसगाव वनपरिक्षेत्र मधील घटना
प्रतिनिधी नेरी,
राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे.वन विभागातर्फे वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो.
ताडोबा बफर झोन मधील पळसगाव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा मार्गलगत साग बनातील वनपरिसरात वनविभागाची लहान रोपे त्या ठिकाणी ठेवली असून ती रोपे पूर्णत: वाळली आहेत.
नेमकी झाडाची रोपे तीही शिस्तबद्ध पद्धतीने वाळविल्याचे निदर्शनास येते़ यामुळे ती वाळली की वाळविली,असा प्रश्न उपस्थित होत आहे.रोपांची सुरक्षा धोक्यात आल्याने पळसगाव वनपरिक्षेत्र मधील इतर वनबीटा मधील झाडांच्या रोपांची सुरक्षेचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे़.विविध प्रकारची झाडे लावण्यासाठी ठेवण्यात आली आहेत़ यात काही झाडे वडाची सागाची आहेत; पण यापैकी काही रोपे झाडे पूर्णत: वाळली आहेत़ केवळ वाळलीच नाही तर यातील काही रोपे पूर्णतः मेलेली दिसत आहेत.अर्धेअधीक माती भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये केवळ वाळलेली मातीच असल्याचे पुढे आले.त्यामुळे आणलेली रोपे अगोदरच तर वाळलेली होती की काय ? त्या ठिकाणी नेली असा संशय व्यक्त होत आहे़.काहींना या बाबत विचारणा केली असता त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ही परिस्थिती मागील काही महिन्यांपासून अशीच असल्याचे सांगितले.
या रोपाची प्रत्यक्ष पाहणी केली असता ही रोपे खन्न वाळली आहेत़ वाळलेली झाडे पाहून ती वाळविल्याची जास्त शक्यता दिसते़.या झाडांबाबत वनविभाग दुर्लक्ष करीत दिसत असल्याने या परिस्थितीमुळे रोपवाटीकेचा झाडे मातीत गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.
——————————————————————–
महिनेवारी वनमजुराचा हस्ते केल्या जात आहे वृक्ष लागवड
वनविभागात वनकुटी व प्लँटेशन मध्ये काम करणाऱ्याच्या माहिनेवारी मजुरांच्या हस्ते वृक्ष लागवड केल्या जात असून त्या ठिकाणी गावातील दुसऱ्या मजुरांना प्राधान्य न देता आपल्या जवळील फक्त महिनेवारी वनमजुर करावी काम केल्या जात आहे.त्यामुळे त्या मजुरांना दुहेरी मजुरी मिळले का? की फक्त महिनेवारी मजुरी मिळेल याची उलटसुलट चर्चा गावात चालू आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
सदर घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी झाडे पूर्णतः वाळलेली दिसली त्या झाडाचा वनकर्मचारी सोबत पंचनामा केला असून अतिक्रमण जागेवर फळझाडे लावावे,मेलेले झाडे वनविभागाणे लाहू नये,मेलेल्या झाडांची संख्या जास्त आहे.
आकाश भेंडारे
सरपंच पिपर्डा


