बस समस्येने विद्यार्थी त्रासले, युवसेनेसह बसस्थानकावर धडकले

485

युवासेना आक्रमक, आगार प्रमुखांना विचारला जाब

वरोरा : तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवेत होणाऱ्या समस्यांना घेऊन युवासेना आक्रमक झाली आहे.वारंवार निवेदन देऊन सुद्धा समस्यांचे निराकरण होत नसल्याने युवासेनेचे वतीने वरोरा बसस्थानक आगारात विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात युवासेनेचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आगार प्रमुखांना जाब विचारला.

.      गावात शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते. मात्र बसने प्रवास करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर काही गावात बसच जात नसल्याने विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करत मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांचे शैशनिक नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही तर बसमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना भररस्त्यात उतरविण्यात येत असून वाहक व चालकांकडून असभ्यतेची वागणूक देण्यात येते या आदी समस्यांना घेऊन जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात वरोरा बसस्थानक आगारात आंदोलन करण्यात आले. या आदोलनादरम्यान आगार प्रमुखांना जाब विचारात विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात यावा अन्यथा पुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

.      यावेळी मंगेश ढेंगळे, आकाश चतुरकर, तुषार पाल, राकेश टापरे, अर्जुन मांडवकर, प्रदीप लिल्लारे, दादा बुरान, मोनेश भोयर, रोशन खारकर, चेतन ढवस, आदित्य चौधरी, रोशन भट, हर्षल चौधरी, गणेश तोडासे, विनोद गेडाम, सतीश बावणे, रीतिक सावरकर, तपस्वी कुळसंगे, टोनी, शिवा वाराटकर, रुपेश चिंचोलकर, दीपक धूर्वे, सुरेश चौधरी व असंख्य विद्यार्थी युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.