बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात फळे वितरण

24

काँग्रेसचा सामाजिक उपक्रम

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

विसापूर : बल्लारपूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष व रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना फळे वितरीत करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

.      अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांचा जन्मदिवस युवक काँग्रेसने सेवा दिन म्हणून साजरा केला. बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना यावेळी फळाचे वितरण करण्यात आले.

.     यावेळी बल्लारपूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगरसेवक राजू झोडे, युवक काँग्रेसचे चेतन गेडाम, जुनेद सिद्दीकी, विनोद आत्राम, करण कामटे, सुरेश बोपनवार, अरविंद आत्राम आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.