झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

421

जामसाळा नवीन येथील घटना

सिंदेवाही : पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा जामसाळा नवीन येथील सुबोध तीलकदास नागदेवते (३५) यांचा शनिवारी दुपारच्या सुमारास झाडावरून खाली पडून मृत्यू झाला असल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

.       बकऱ्याना झाडाचा पाला आणण्यासाठी सुबोध तिलकदास नागदेवते हे गावाशेजारी असलेल्या जंगलात गेले असता झाडावरुन खाली पडुन गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना त्वरित सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सुबोध यांची गंभीर अवस्था असल्याने त्यांना चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सुबोध हे विवाहित असुन त्यांना ४ वर्षाची एक मुलगी आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ असा आप्त परिवार आहे. सुबोध यांचे अचानक निधन झाले असल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.