पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई
चोरबीटी विक्रेत्यात दहशत
कोठारी : कोठारी-काटवली फाट्यावर दुचाकीने चोरबीटी वाहतूक करतांना पोलिसांनी झडती घेऊन अंदाजे वीस हजाराची अवैध बियाणे जप्त करण्याची कारवाई शनिवार २ जून ला संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. विकास नामदेव खाडे रा. पळसगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे बल्लारपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून चोरबीटी विक्रेत्यात दहशत निर्माण झाली आहे.
. कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांनी कृषी अधिकारी, बल्लारपूर यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली की, गोपनिय माहीती वरुन कोठारी ते काटवली मार्गाने एक इसम मोटर सायकलवर चोरबीटी कापूस बियाण्याची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यास आनले आहे. तरी सदर इसमाकडुन ताब्यात घेतलेले चोरबीटी बियाण्याची शहानिशा करण्याबाबत माहीती दिल्याने आम्ही तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हान यांचे सह पोलीस ठाणे कोठारी येथे हजर आलो. पोलीसांनी ताब्यात घेतलेला इसमास नाव विकास नामदेव खाडे (38) रा. पळसगाव, ता. बल्लारपूर जिल्हा चंदूपर असे आहे.
. सदर इसमाकडे मिळुन आलेल्या चोरबिटी बियाण्याची पाहणी केली असता पवनी सीड्स या नावाचे 20 पॉकीट प्रती पॉकेट वजन 450 ग्रॅम (450×20=9000 ग्रॅम) प्रमाणे एकुण 9 किलो किंमत प्रती पॉकेट 930/- रुपये प्रमाणे एकुण किंमत 18,600/- रुपये असलेल्या सदर बियाण्याच्या पाँकीटांवर कोणताही परीपुर्णे भरलेल्या टॅग आढळून आलेले नाही तसेच सदर पाँकीटांवर उप्तादकाचा पत्ता देखील नमुद नसल्याचे आढळले. या वरुन सदर बियाणे हे अनधिकृत एचटीबीटी असल्याची शक्यता आहे.
. संबंधीत बियाण्याचे वेष्ठन लेबल यावरील मजुकरी इत्यादी बाबी पाहता स्वतःच्या आर्थीक फायद्याचे उद्देशाने कलम 188 भा.द.वि 1860 व बियाणे नियंत्रण आदेश खंड 3 (1) 8 (अ) नुसार आरोपीने गुन्हा केलेला आहे. सर्व कापूस बियाणे पाँकीटावर बियाणे नियम 1968 चे नियम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 38 नुसार लेबल मध्ये बियाणे उत्पादक विक्रेत्याचे नाव तथा त्याच्या गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादक व विक्रेत्याच्या उल्लेख नसल्यामुळे सदरील नियमाचे उल्लघंन केले आहे त्या नुसार बियाणे कायदा 1966 कलम 7, 19 च्या शिक्षेस पात्र आहे. विनापरवाना कापुस बियाण्याची साठवणुक पॅकींग व विक्री यामुळे बियाणे कायदा 1966 मधील खंड 7 चे व महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियम 2009 व नियम 10 नुसार तरतुदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपी हे शिक्षेस पात्र आहे.
. जीईएसी च्या मान्यतेचा उल्लेख नसलल्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 7 (3) (4), 15, 16 व पर्यावरण संरक्षण नियम 1989 मधील नियम 7, 8, 9, 10 तरतुदीचे उल्लंघन झालेले आहे. त्यानुसार आरोपी हे शिक्षेस पात्र आहे. सदर ताब्यात घेतलेल्या इसमाने सदर बियाणे त्याला सतीश भोंगळे रा. विरुर याने दिल्याचे त्याचे बयानात सांगितले आहे. त्यामुळे संशयीत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची साठवणुक, वाहतुक करणे बेकायदेशीरिरत्या बाळगणे विक्री करणे, पुरवठा करणे या करीता विकास नामदेव खाडे (38) रा. पळसगाव, ता. बल्लारपूर जिल्हा चंदूपर, सतीश भोंगळे, रा. विरुर यांचे विरुध्द संशयीत कापूस बियाणे बाळगणे व विक्री करणे याबाबत विवेक शेषराव उमरे कृषी अधिकारी, पंचायत समीती बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर वर नमुद कलमानुसार सदर फिर्याद शासनाच्या वतीने दाखल केली आहे.


