Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा तहसीलदारांच्या आवाहनाला गावकऱ्यांचा “हो”

वरोरा तहसीलदारांच्या आवाहनाला गावकऱ्यांचा “हो”

1428

अवैध रेती तस्करांचे धाबे दनाणले

बामर्डा येथे 15 ब्रास रेती साठा जप्त

जप्ती केलेला रेती साठा घरकुलधारकांना वितरित

वरोरा :  रेती अभावी घरकुलाचे काम थांबू नये. यासाठी वरोरा चे तहसीलदार यांनी पुढाकार घेत अवैध रेती धाडसत्र सुरू केले. वरोरा तालुक्यातील कुठल्याही गावात अवैधरीत्या रीतीची साठवणूक करून दिसल्यास वरोरा महसूल विभागाला माहिती देण्याचे आवाहन तहसीलदारांनी गावकऱ्यांना केले होते. तहसीलदाराच्या आवाहनाला “हो” म्हणत गावकऱ्यांनी तहसीलदारांना सहकार्य केले.

.     घरकुल मंजूर झाले पण रेतीच मिळत नाही म्हणून हतबल झालेले घरकुल लाभार्थी मोठ्या संकटात सापडले होते. या घरकुल लाभार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले ते वरोराचे तहसीलदार स्वतः खडतड रस्त्याने पायदळ जात अवैध रेती साठ्यावर व रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करीत कारवाही केलेला रेतीसाठा त्याच गावातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत दिल्या जात आहे.

.     मौजा – बामर्डा येथे दि. 17 मे  रोजी महसूल पथकाने सार्वजनिक जागेवर 15 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. सदर रेती साठा माढेळी येथील घरकुल लाभार्थी नंदाबाई पुरुषोत्तम चिकडे यांना 3 ब्रास, एकनाथ विजय आगलावे 3 ब्रास, कलावती विठ्ठल आवारी 3 ब्रास, संगिता नितीन फुलझेले 1 ब्रास, मोरेश्वर मारोती मुळे 2 ब्रास, ब्रम्हदेव बीजाराम कुळसंगे 1 ब्रास, मंगला नथ्थु मडावी 1 ब्रास, वंदना तुकामरा ढाले 1 ब्रास या 8 घरकुल लाभार्थीं यांना मंडळ अधिकारी, माढेळी, तलाठी, माढेळी पोलीस पाटील, माढेळी व ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. तसेच मौक्यावर 1 ब्रास रेती साठा भरलेला टॅक्टर जप्त करण्यात आला. असून सदर ट्रक्टर मालकावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!