Home पोलीस डायरी वरोऱ्यात आयपीएल सट्टा बाजावर पोलिसांची धाड

वरोऱ्यात आयपीएल सट्टा बाजावर पोलिसांची धाड

1363

३० जणांना अटक

२ लाखाचा मुद्देमाल जप्त

एसडीपीओ साटम यांची धाडसी कारवाई

वरोरा : आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणाऱ्या सट्टा बाजावर, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत ३० सट्टेबाजावर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडून २ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

.       प्राप्त माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे, स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलीस स्टाफसह, वरोरा येथील बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला गुघाने यांचे घरी एक खोली मध्ये ओमप्रकाश देविदास जाधव, आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहाने, चिन्नस्वामी स्टेडीयम, बॅगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत असल्याची माहीती मिळाली त्या आधारे धाड टाकून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अॅक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकुन २,६७,४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

.        आरोपी ओमप्रकाश देविदास जाधव (४३), आशिष गजानन जाधव (२७) दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, मिनाज शेख रा. वणी जि. यवतमाळ, जम्मु शेख रा.वणी जि.यवतमाळ, रितीक जाधव, अमोल डांगरे, अमोल टिपले, बादल लाखा, भुषण दिक्षीत, डॉ. काळे, अजिंक्य नरडे, अमित घोडमारे, समीर पाटील, सुरज रा. बुटट्टीबोरी नागपुर, राजेश तुपकर, रवि गभणे, राहुल टिपले, पिंन्टु तडस, पिंन्टु टोंगे, प्रसाद खडसान, कुणाल चिमुरकर, मोहीत शर्मा, अनिल पाटील, पंकज वैद्य, अमित भगत, गौरव, अतुल वानखेडे, मंगेश सर्व राहणार वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.

.     सदर कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय अधिकारी वरोरा नयोमी साटम, सपोनि विनोद जांभळे, पो.अं. दिपक दुधे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.

error: Content is protected !!