Home पोलीस डायरी प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध

प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध

1395

पास्को अंतर्गत गुन्हा दाखल

लाडबोरी येथील युवकाला पोलिसांनी घेतलें ताब्यात

सिंदेवाही : “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं” असे म्हणत आजकाल अनेक अल्पवयीन मुले मुली एकमेकांच्या प्रेमात पडून नकळत शारीरिक शोषण करीत असतात. मात्र त्याचा मनस्ताप हा मुलामुलींच्या आईवडिलांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या लाडबोरी येथे घडला असून येथील एक २२ वर्षीय तरुण यांनी एका १७ वर्षाच्या मुलीसोबत प्रेमाच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार त्याला अटक करण्यात आली आहे. साहिल सुनील नागदेवते लाडबोरी असे आरोपीचे नाव आहे.

.       लाडबोरी येथील साहीलचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याचाच फायदा घेत साहिलने त्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी मुलीची तब्येत बिघडल्याने आईवडिलांनी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. व फिर्यादी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादिने तक्रार दाखल करताच पोलीसानी मुलीचा बायान घेऊन याबाबत मुलीला विचारणा केली. मुलीने लाडबोरी येथील साहिल नागदेवते या २२ वर्षीय तरुणाचे नाव सांगताच पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतले. आणि त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार अपराध क्रमांक २३५, कलम ३७६ (N) भांदवी सह कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे त्याला अटक केली आहे.

.       सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थुल पुढील तपास करीत आहेत. सिंदेवाही तालुक्यात मागील सहा महिन्यात पास्को अंतर्गत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलामुलींना योग्य संस्कार करणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!