Home सामाजिक श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

1554

वरोरा : येथील तुरणा रोड फिल्टर टाकी येथील श्री स्वामी समर्थ धाम मंदिरामध्ये 6 मे रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ६ वाजता मंदिराचे पुजारी गुरुवर्य राजूरकर महाराज, यांच्या शिष्यगणासह महाराजांचा महा मस्तकाभिषेक संपन्न झाला.

.        या अभिषेक शिष्य श्रेय बोधाने, संजय चौधरी, अनिकेत भोयर, प्रशांत डोंगरवार, प्रशांत भोयर, पंढरीनाथ खिरटकर, भारत तोडकरी, हर्षल आसुटकर, बंडू आसुटकर तसेच श्रीकृष्ण घड्याळ पाटील यांची अभिषेकाच्या वेळी उपस्थिती होती. दुपारी बारा वाजता स्वामींचे मनोभावे आरती करण्यात आले. यावेळी असंख्य भक्तगण या महाआरतीला उपस्थित होते. साडेबारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाला वरोरा शहरातील अनेक गणमान्य भक्त सेवकांनी हजेरी लावत महाप्रसादाचा आनंद घेतला यावेळी मंदिरात भाविकांची एकच गर्दी उसळली होती.

error: Content is protected !!