Home पोलीस डायरी मैत्री दिनी मित्रानेच मित्राला दगडाने ठेचले

मैत्री दिनी मित्रानेच मित्राला दगडाने ठेचले

834
  • सिंदेवाही बसस्थानक वरील घटना

सिंदेवाही    देशात सगळीकडे अनेक जन मैत्री दिनाच्या तयारीत असताना मात्र सिंदेवाही येथे मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला मित्रानेच मित्राला दगडाने ठेचल्याची धक्कादायक घटना घडली असून सिंदेवाही बसस्थानक या सार्वजनिक ठिकाणी सदर घटना घडली. आदित्य बिगानशाह सोनी रा. सिंदेवाही (१८) असे जखमीचे नाव असून अंकित गायकवाड आणि त्याचा मोहाळी येथील अल्पवयीन मित्र या दोन्ही आरोपींना सिंदेवाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जखमीची आई अनिता बिगनशाह सोनी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार घटनेच्या दिवशी आदित्य हा काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. जेवण करायची वेळ झाली म्हणून आई अनिता हिने जखमी आदित्यला फोन लावला. मात्र त्याचा फोन इतरांनी उचलून आदित्यचा झगडा झाला असून त्याला जबर मार लागलेला आहे. त्यामुळे त्याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. असे समजताच आई ग्रामीण रुग्णालयात आली. मात्र तेव्हा जखमी आदित्य बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळें आई अनिता यांनी सिंदेवाही पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे सिंदेवाही पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध भांडवी ३२४, ३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकार एका मुलीच्या कारणावरून झाला असल्याची चर्चा सुरू असून तिघेही चांगले मित्र होते. मात्र मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला तिघांनीही मध्य प्राशन करून बसस्थानक परिसरात मैत्री दिनाची तयारी करण्याचा बेत आखत असताना अचानक एका मुलीच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्या. आणि त्यावरून प्रकरण वाढत जावून हाणामारी वर आल्याचे समजते. यामध्ये आरोपी अंकित आणि त्याचा अल्पवयीन मित्र या दोघांनी आदित्यला बेदम मारहाण करून दगडाने ठेचल्याचे चित्रफीत वरून दिसून येते..आदित्य सध्या चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. बसस्थानक सारख्या सार्वजनिक ठिकाणी अशी घटना घडली असल्याने अनेकांनी फिल्मी स्टाईल झालेली मारामारी बघून कोणताही व्यक्ती मध्यस्थी न करता केवळ आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ करण्यात व्यस्त असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!