Home पोलीस डायरी कारवा जंगलात फिरणार्‍या दोघांना बल्लारपूर वन विभागाने घेतले ताब्यात

कारवा जंगलात फिरणार्‍या दोघांना बल्लारपूर वन विभागाने घेतले ताब्यात

1327
  • दुचाकी व ज्वलंशिल साहित्य केले हस्तगत
  • लाईव्ह कॅमेरात झाले कैद

विसापूर : बल्लारपूर वन विभागाच्या कारवा जंगलात वाघ व बिबट्याचा वावर आहे. भक्ष्याच्या शोधार्थ वन्य प्राणी मानवी वस्तिकडे धाव घेत आहे. परिणामी मानव व वन्य प्राणी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून वन विभागाने नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी जंगलात काही ठिकाणी लाईव्ह कॅमेरे लावले आहे. अशातच रविवार (दि. १७) मार्च रोजी जंगलात दोघेजण संशयित फिरताना लाईव्ह कॅमेऱ्यात दिसले. कारवा सफारी गेट जवळ त्या दोघांची झडती घेतली असता त्यांचे जवळ ज्वलन्शिल पदार्थ आढळून आले. याप्रकरणी बल्लारपूर वन विभागाने त्यांना ताब्यात घेऊन ज्वलन्शिल पदार्थ व दुचाकी हस्तगत केली. ताब्यात घेतलेल्याची नावे चंदन वासुदेव तिलोकांनी (36) रा. गांधी वार्ड बल्लारपूर व सारंग शैलेश राहुलगडे (23) रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर असे आहे.

.       बल्लारपूर वन विभागातील कारवा जंगलात सरपण गोळा करण्यास गेलेल्या एका इसमाचा नरभक्षी वाघाने बळी घेतला. या घटनेच्या एक दिवसापूर्वी अंगणात खेळत असलेल्या सात वर्षाच्या बालिकेला बिबट्याने जबर जखमी केले. यामुळे नागरिकात बिबट व वाघाची दहशत निर्माण झाली. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी बल्लारपूर वन विभागाने १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे व चार ठिकाणी लाईव्ह कॅमेरे लावले होते. बल्लारपूर वन विभागातील राखीव वन क्षेत्र कक्ष क्र. ४९3 मध्ये चंदन तिलोकांनी व सारंग राहुलगडे हे बेकायदेशीररित्या जंगलात शिरून फिरताना लाईव्ह कॅमेऱ्यात दिसून आले. यामुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले.

.       वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्या दोघांची कारवा सफारी गेट जवळ थांबवून झडती घेतली. त्यावेळी त्यांना धक्का बसला. अवैधरित्या जंगलात फिरून आग लावण्याचा प्रयत्न करत आल्याचा संशय आला. त्यांचे कडून ज्वलन्शिल पदार्थ हस्तगत करण्यात आले. त्याच प्रमाणे नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्या दोघांवर वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) ब, ड अन्वये प्राथमिक वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.       ही कारवाई बल्लारपूर वन विभागातील अधिकारी व कर्मचारी ए. एस. पठाण, व्ही. पी. रामटेके, बी. टी.  पुरी, सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आनकडे, रणजित दुर्योधन, वैशाली जेणेकर, माया पवार, सुनिल नन्नावरे, मनोहर धाईत, धर्मेंद्र मेश्राम व एस. आर. देशमुख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे.

error: Content is protected !!