जागतिक महिला दिनी महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

37

वरोरा : महाराष्ट्र आणि देशातल्या सार्वजनिक व्यवस्थेला टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता कोरोना सारख्या संकटात सुद्धा आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून जनतेच्या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिल्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन येथील महिला अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान पत्र व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.

.      राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलिस स्टेशन वरोरा येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हॅलोंडे, अनिता लोहकरे, मनीषा कुत्तरमारे, सुषमा पवार, अश्विनी शेप, चेतना कोंबरडडीवार, नीता दूबे, सुजाता रामटेके, जया नन्नावरे या महिला कर्मचार्‍यांचा  सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

.      यावेळी वरोरा पोलिस स्टेशन चे ठाणेदर अमोल काचोरे, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रंजना पारशिवे, तालुकाध्यक्ष रवि भोयर, वरोरा शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, सुनीता नरडे, गीता नवले, मंजुषा पारशिवे आणि सर्व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.