- सात व्यक्तिमत्त्वांच्या आईचा सन्मान
नागभीड : तालुक्यातील जि. प.उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथे जागतिक महिला दि ८ मार्च निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ६९ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन केले. यात चौदा विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले.![]()
. छोट्याश्या गावात शासकीय नोकरीत लागलेल्या सात व्यक्तिमत्त्वांच्या आईचा सन्मान करण्यात आला. खरेतर लेकरांना नोकरीवर लावताना तिची झालेली आभाळ, तिने सोसलेले भोगलेले जीवन याची दखल घेत निमित्ताने अशिक्षित मातेचाही होणारा सत्कार बघून सर्व ग्राम महिला भारावून गेल्या होत्या. यात प्रतिभा गुरनुले, सरस्वता जांभुळे, प्रेमिला गुरनुले, सत्यभामा नंदपूरकर, रमाबाई सोनुले, सुनंदा भरणे, सुंदरा गुरनुले यांचा सत्कार करण्यात आला.
. सदर कार्यक्रमाचे आयोजन संजय येरणे यांनी , सूत्रसंचालन करिष्मा चौधरी, रेश्मीता गुरनुले यांच्या सहकार्यातून सुंदर कार्यक्रम घडून आला. अध्यक्षस्थानी जयश्री उईके शा. व्य. समिती तर उद्घाटक कल्लू नेवारे सरपंच हे होते. तर गावातील प्रथम महिला पोलीस आरती गुरनुले प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन केले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बेबी उईके, तुळशीफुला गुरनुले, सरिता मोहुर्ले, सत्यभामा नंदपुरकर, वर्षा गेडाम, अर्चना नान्हे, वासनिक, मातापालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


