ब्रम्हपुरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयसीआयसीआय फाउंडेशन च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील बोद्रा या गावातील महिलांसाठी सामजिक,आर्थिक, महिला उद्योग, महिलांसाठी शासनाच्या योजना या विषयांवर मार्गदर्शन करीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
. यावेळी पर्यावरण व जंगल रक्षण या विषयावर चर्चा करण्यात आली. फळझाडे देऊन महिलांचा सन्मान करन्यात आला व महिलांच्या हाताने वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लता सगळाम, सचिव रजू सगळाम, बचत गट सिआरपी अश्विनी शेंडे, ग्राम. सदस्य अशोक बोरकर, विश्वनाथ सगळाम तसेच गावातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन आयसीआयसीआय फाउंडेशन चे संदीप मोरे, नितेश गलबले, विकास अधिकारी मोनिष गोडबोले यांनी केले होते.


