Home सामाजिक तुमगांव येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

तुमगांव येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

1180

वरोरा : शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित तुमगांव येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

.         या शिबिरात 40 रक्त दात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. व सोबतच गावातील युवा, ज्येष्ठ,महिला पुरुष यांची आरोग्य तपासणी केली, या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष न. प.वरोरा, डॉ. विजय देवतळे. सभापती कृ. उ.बाजार. समिती,वरोरा यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी गावातील नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्यांना शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान तर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

.         या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला म्हणून शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान, तुमगांव चे अध्यक्ष आकाश मेश्राम, उपाध्यक्ष आशिष भुते व सचिव यश काकडे यांनी सर्वाचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी   सर्व सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले.

error: Content is protected !!