Home सामाजिक भद्रावती तालुक्यात रूजते सांस्कृतिक चळवळ! 

भद्रावती तालुक्यात रूजते सांस्कृतिक चळवळ!

1170

 अनिरुद्ध वनकर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी 

सुधीर पारधी
  भद्रावती :सुप्रसिद्ध गायक, नट, नाट्य निर्माते व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी भद्रावती तालुक्यात सांस्कृतिक चळवळ उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चर सेंटरची म्हणजेच बाईक या संस्थेची स्थापना केली असून तालुक्यातील टाकळी या गावात अडीच एकरामध्ये नाट्य प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली असून त्याचे 13 तारखेला विधिवात उद्घाटन पार  पडलेले आहे.

.         भद्रावती शहर हे ऐतिहासिक शहर आहे. अलीकडे औद्योगीकरण झाल्यामुळे या शहरातची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. शहरात विविध कार्यक्रम घेतल्या जातात असे असले तरी सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने हे शहर अतिशय मागासलेले समजले जाते. या शहर तथा तालुक्यात हर हृनरी कलावंत आहेत. मात्र त्यांना योग्य दिशा व संधी न मिळाल्यामुळे ते केवळ हातपाय मारून नाव लौकिक मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे ,मात्र योग्य संधी व व्यासपीठ नसल्यामुळे त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरत आहे.

तीस वर्षांपूर्वी येथील तत्कालीन परीदृढ या संस्थेतर्फे दरवर्षी भव्य स्वरूपात एकांकिका स्पर्धा घेऊन शहर तथा तालुक्यात सांस्कृतिक बीज जोडण्याचा प्रयत्न केला गेला होता ,मात्र कालांतराने या स्पर्धा बंद पडल्यामुळे तेव्हापासून सांस्कृतिक चळवळीत भद्रावती शहर तथा तालुका कितीतरी मागे फेकले गेले. त्यानंतर आता अनिरुद्ध वनकर यांनी या मातीत सांस्कृतिक चळवळीचे बीज रोवले आहे  हि तालुक्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. तालुक्यातील टाकळी येथील लहानशा गावात अनिरुद्ध वनकर यांनी नाट्य कलावंत प्रशिक्षण केंद्राचा प्रकल्प साकार करून तालुक्यातीलच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील नाट्य कलावंतांना एक मोठी संधी प्राप्त करून दिली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. अडीच एकर जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज खुल्या रंगमंचाचे निर्मिती करण्यात आली असून या संपूर्ण परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे.

.         याशिवाय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या नावाने येथे प्रशिक्षण हाल ही पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय महात्मा गांधी झाडीपट्टी प्रदेश सांस्कृतिक संग्रहालय, डॉक्टर अब्दुल कलाम सांस्कृतिक संशोधन केंद्र, वामनदादा कंडक संगीत व नाट्य कारखाना, बिरसा मुंडा आदिवासी नृत्य लोककला विभाग तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय व अध्यात्मिक केंद्र या परिसरात निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी देशभरातून सामाजिक बांधिलकी जपणारे कलावंत घडतील आणि राष्ट्र निर्माणात ते आपले योगदान देतील असा विश्वास अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केला आहे.

.         या केंद्राच्या माध्यमातून उत्ततोमोत्तम  कलाकार घडून येतील कलावंत आपले नाव जगभर करील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

error: Content is protected !!