ब्रह्मपुरी : तालुक्यातील रनमोचन येथील ग्रामपंचायत कार्यालय महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून २४ फेब्रुवारीला रात्री १०:३० रणमोचन नवीन वस्ती येथील हनुमान देवस्थान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात प्रेमी युगलांचा पेमविवाह समारंभ वर मुलाकडील मित्रमंडळी व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थिती संपन्न झाला.
. शिशुपाल मंगेश हिवरकर (२३) राहणार शेगाव ( बु) असे वर मुलांचे नाव असून पूजा राजू दडमल (२२) राहणार मेसा असे वधू मुलीचे नाव आहे. दोन्ही तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. शिशुपाल आणि पूजा यां दोघांचे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. मात्र वधूच्या घरच्यांकडून विरोध असल्याने दोघेही घरून पळून येऊन ब्रह्मपुरी तालुक्यातील नातेवाईकाकडे आले. वरांच्या नातेवाईकांनी रनमोचन येथील ग्रामपंचायत तंटामुक्त समिती तसेच हनुमान देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्याकडे लग्न लावून देण्यासाठी आग्रह केला. वर मुलगा शिशुपाल हिवरकर आणि वधू पूजा राजू दडमल यांच्या टी.सी. ची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये वराचे वय २३ तर वधूचे वय २२ वर्षे दिसून आल्याने. कागदपत्राची पडताळणीची शहानिशा करूनच या प्रेमी युगलांचा विवाह हिंदू रिती- रिवाजाप्रमाणे हनुमान देवस्थान मंदिर नवीन वस्ती येथे शनिवार दिनांक २४ फेब्रुवारीला रात्री १०:३० वाजता संपन्न झाला.
. लग्नकार्यप्रसंगी उपस्थितांमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलिमा निळकंठ राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे, हनुमान देवस्थान कमिटीचे सचिव घनश्याम दोनाडकर, तंटामुक्त समितीच्या निमंत्रक तथा पोलीस पाटील अस्मिता पिलारे, किन्ही येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनुप प्रधान, किन्ही येथील मधुकर बुल्ले, मारोती आटे, चंद्रकांत ऊरकुडे, कैलास आटे, रनमोचन तंटामुक्त समितीचे सदस्य राजेश्वर दोनाडकर, श्रावण तोंडरे, रेशम शेंभरकर, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळी लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या.


