वरोरा : हिरालाल लोया विद्यालय, वरोरा येथे दरवर्षी सत्राअखेर वर्ग 10 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्नेहपूर्ण निरोप दिल्या जातो. या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे सत्र 2023-24 मध्ये शिकणाऱ्या वर्ग 10 मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रविकांत जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया, दुसरे सचिव रामबाबू लोया, संस्थेचे सदस्य श्यामबाबू लोया, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुनीता मुळे, पर्यवेक्षिका अर्चना ढोले, पर्यवेक्षक प्रभाकर ढाले, पर्यवेक्षक महेश डोंगरे उपस्थित होते.
. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपले शालेय प्रवास व अनुभव व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षा विभाग प्रमुख सुरेन्द्र मेश्राम यांनी सराव परीक्षेच्या निकालाचे वाचन केले व वामन आसुटकर यांनी परिक्षेविषयी महत्वाच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत आपल्या भावना मांडल्या व त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या. या कार्यक्रमाचा शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया पोटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाच्या शिक्षिका वीणा आंबटकर यांनी केले तर आभार रेखा बगडे यांनी मानले.


