Home सामाजिक झाडीपट्टी महोत्सवात वासेरा येथील दंडारीचे सादरीकरण

झाडीपट्टी महोत्सवात वासेरा येथील दंडारीचे सादरीकरण

1175

मूल येथे तीन दिवसीय झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव संपन्न

सिंदेवाही : झाडीची कला लोप न पावता, ती चिरकाल जिवंत राहावी, तिचे जतन, आणि संवर्धन व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांचे वतीने जिल्ह्यातील मुल येथे तीन दिवसीय झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव पार पडला असून या झाडीपट्टी महोत्सवात सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नवयुवक दंडार मंडळाच्या वतीने प्रधानजीचा कारस्थान” या दंडारीचे सादरीकरण करण्यात आले.

.        चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, या पूर्व विदर्भातील भागाला झाडीपट्टी या नावाने संबोधल्या जाते. झाडीपट्टी ही विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून या कलेविषयी जनसामान्यांमध्ये आत्मीयता आहे. या झाडीपट्टीची देहबोली, भाषा, आणि कला ही वेगवेगळी असून झाडीपट्टी कलेचे जतन, व संवर्धन करण्याच्या दृष्टीने, आणि ही कला चिरकाल जिवंत राहावी, व झाडीपट्टीतील विविध कलागुणांना वाव मिळावा. हा उद्देश घेऊन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांचे वतीने दिनांक १८ ते २० फरवरी दरम्यान झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव मुल येथील क्रीडा संकुल परिसरात आयोजित करण्यात आला. यामध्ये झाडीपट्टीतील नाटके, झाडीच्या लोककलांची मिरवणूक, आदिवासी नृत्य, रेला नृत्य, झाडीबहार हा झाडीपट्टीतील गायकांचा सुगम संगीत कार्यक्रम, भूलाबाईची गाणी, कीर्तन, झाडीची दंडार, वैदर्भीय संबळ वाद्य, डहाका वाद्य, महादेवाची गाणी, रोवण्याची गाणी, खडी गंमत, लावणी, स्टँडअप कॉमेडी झाडीचा छोकरा, झाडीपट्टीचे गाजलेले नाटक, असा नवरा नको ग बाई, या सारख्या कलांचे सादरीकरण करून नागरिकांचे मनोरंजनच नव्हे, तर प्रबोधन देखील करण्यात आले.

.        मंगळवारी दुपारी १२ वाजता वासेरा येथील नवयुवक दंडार मंडळाच्या वतीने प्रधानजीचा कारस्थान या दंडारीचे सादरीकरण करण्यात आले आहे. दंडार ही लोककला लोप पावत असताना वासेरा येथील ३० वर्षाचा युवक राजू मस्के यांनी स्वतः दंडारीचे लेखन करून आणि स्वतः स्त्री पात्र भूमिका साकारत ही कला जिवंत ठेवण्याचे काम करीत असल्याने त्याच्या कलेची दखल घेत आयोजन समितीने २०२४ झाडीपट्टी महोत्सवात वासेरा येथील नवयुवक दंडार मंडळाच्या वतीने दंडारीचे सादरीकरण करण्यात आले.

error: Content is protected !!