Home सामाजिक महर्षि वाल्मिकी ऋषीं च्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

महर्षि वाल्मिकी ऋषीं च्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

1131

  दोन दिवसीय महर्षि वाल्मिकी घटस्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन  

नेरी : चिमूर तालुक्यातील काजलसर येथे महर्षि वाल्मिकी ढिवर समाज काजळसर व अडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन दि 17 व 18 फेब्रुवारी ला विकास मच्छिमार सोसायटी च्या प्रांगणात अनेक विविध कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात येऊन संपुर्ण काजळसर नगरीतून फिरवत महर्षी वाल्मिकी च्या जयघोषाने संपुर्ण परिसर दणाणून उठला.

.       दि 17 व 18 फेब्रुवारी ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात किर्तन, भजन शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले. श्री महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली यात ‘डोल ताशा च्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

.       महर्षी वाल्मिकी च्या जयघोषाने संपुर्ण परिसर दणाणून सुटला होता वाजत गाजत मिरवणूक संपूर्ण नगरीतून फिरून सोसायटी च्या प्रगणात सांगता झाली . या कार्यक्रमाचे उदघाटक प्रकाश डहारे नागपूर, यशवंत दिघोरे अध्यक्ष, दिनानाथ वाघमारे, रंजना पारशिवें, मार्गदर्शक म्हणून श्रीहरी शेंडे, आशिष ननावरे सरपंच काजळसर ,विश्वास सामुसाकडे ,अध्यक्ष मच्छिमार सोसायटी हिरामण गेडाम ,उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम, सचिव तर वाल्मिक समितीचे अध्यक्ष काशीनाथ ठाकरे उपाध्यक्ष श्रीकृष्ण सामुसाकडे , शारदा नागपुरे उषा सामुसाकडे राधा सामुसाकडे कुसूम दुधनकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला . सायंकाळी गोपाळकाला व महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वाल्मिकी ऋषी समिती आणि विकास मच्छिमार सोसायटी यांच्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ढिवर समाज व काजळसर वाशीय नागरिकांनी परिश्रम घेतले मोट्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!