वरोरा : भारताचा इतिहासात १४ फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून मानला जातो.कारण याच दिवशी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०जवान शहीद झाले होते.त्या प्रीत्यर्थ पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुर वीरांना शहीद योगेश डाहुले चौक,वरोरा येथे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
. त्यांची सेवा आणी आपल्या देशासाठीच त्यांचं बलिदान नेहमीच आपल्या स्मरणात राहील यावेळी “अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे” असा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी अहेतेशाम अली – माजी नगराध्यक्ष न. प. वरोरा, माजी सैनिक सुबोध बोभारे, प्रविण चीमुरकर, योगेश ठेंगणे, संतोष थैरे, सुयोग बुराण, गणेश मडावी, ठोके, प्रभाकर उपरे, काकडे, हक्के, आशिष ठाकरे, ओम मांडवकर, विठ्ठल लेडे, डॉ.सागर वझे, दिलीप घोरपडे, जगदीश तोटावार, घुडे महाराज, संजय राम, कादर शेख या सर्वांची उपस्थिती होती.


