Home सामाजिक सूर्याची उपासना म्हणजे सकारात्मकता होय– प्रा तानाजी बायस्कर

सूर्याची उपासना म्हणजे सकारात्मकता होय– प्रा तानाजी बायस्कर

1120

    400 विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार अविष्कार   

वरोरा : भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनारायणाच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवराय सुद्धा सूर्यनमस्काराचे उपासक होते आणि नियमित सूर्यनमस्कार घालीत असे. तरुणांनी सुदृढ आणि संपन्न आरोग्य साठी सूर्यनमस्कार केले पाहिजे, यामुळे ऊर्जावान तरुण निर्माण होऊन बलशाली भारत उदयास येऊ शकेल असे प्रतिपादन आनंद निकेतन महाविद्यालयाचे शारीरिक व क्रीडा विभाग प्रमुख प्रा तानाजी बायस्कर यांनी केले. लोकशिक्षण संस्थेत आयोजीत सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रमात ते बोलत होते.

.        रथसप्तमी चे औचित्य साधून लोकशिक्षण संस्थेच्या परिसरात सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी मंचावर लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील होते अध्यक्षस्थानी होते.
आपल्या विवेचनात प्रा बायस्कर यांनी विविध आसने, प्राणायाम आणि मंत्रोच्चाराचे महत्व अधोरेखित करीत व्यायामामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडतात आणि रक्तभिसरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. आज मनुष्याचे आयुष्यमान कमी झाले असून शरीर व मनाची एकाग्रता राखण्यासाठी एखादे क्रीडा नैपुण्य आपण अवगत करावे. त्याकरिता व्यायामामध्ये नियमित असावी असेही ते म्हणाले.

.       याप्रसंगी लोकशिक्षण संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयाच्या 400 विद्यार्थ्यांनी श्री च्या आकारात सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात या प्रसंगी आला. लोकमान्य कन्या विद्यालयाने सादर केलेल्या हरिपाठ आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी स्वागत स्तोत्र, सूर्यकवचक स्तोत्र आणि खुर्चीवरील सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करण्यात आले
प्रास्ताविक निलेश कुत्तरमारे, संचालन लावण्या पोलशेट्टीवार तर आभार अवधूत लाभे यांनी मानले. यावेळी योगप्रेमीची मोठी उपस्थिती याप्रसंगी होती.

error: Content is protected !!