Home सामाजिक आजपासून नंदोरीत पुरूषांचे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने

आजपासून नंदोरीत पुरूषांचे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने

1196

भद्रावती : संत गाडगेबाबा क्रिकेट क्लब नंदोरी च्या वतीने पुरुषांचे भव्य रबरी बॉल क्रिकेट  सामने आज 20 फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी VCCPL कंपनी चे संचालक चंद्रकांत वासाडे नंदोरी च्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

.          या भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती प्रवीण ठेंगणे तर  प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव करण देवतळे, नगर परिषद वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजपा चे नेते डॉ. सागर वझे, ग्राम पंचायत नंदोरीच्या उपसरपंच उषा लांबट, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर रेवतकर, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच शरद खामनकर, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य किशोर उमरे, अजित पुसनाके, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी उपसरपंच विनोद लांबट, शाळा व्यवस्थापन समिती नंदोरी चे अध्यक्ष, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्तिचे अध्यक्ष आशितोष घाटे, माजी पोलिस पाटिल अनिल ठेंगणे, महात्मा गांधी तंटामुक्तिचे माजी अध्यक्ष रमेश तिखट गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

.          या कबड्डी सामन्यांमध्ये नियम राहणार आहे. प्रत्येक सामना ६ षटकांचा राहिल,  एका खेडाळूस ऐकाच संघाकडुन खेळता येईल, कोणत्याही दोन गोलंदाजास २ षटके राहील, संघ २० मिनिटे उशिरा आल्यास विरोधी संघास विजयी घोषित करण्यात येईल, उपांत्य व अंतिम सामना ७ षटकांचा राहील, प्रत्येक खेळाडूला सामना खेळतेवेळी बुट अनिवार्य राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील, नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही, काही नियम मंडळाकडे राखीव ठेवण्यात आले आहे.

error: Content is protected !!