Home सामाजिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप

1182

नागभीड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

.         शिवसेना नागभीड तालुका प्रमुख मनोज लडके यांचे नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील रुग्णांना फळे, बिस्कीट वाटण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गावंडे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत पिसे, उप-शहर प्रमुख, राजेश तेजेकर, प्रदीप नांदगुरवार, पंकज कोरडे, चंदन खापर्डे, मयूर वंजारी, आणि बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

error: Content is protected !!