Home Breaking News रानटी डुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

रानटी डुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

902
  • रानटी डुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
  • खडसंगी – बरडघाट शिवारातील घटना

चिमुर | शेतात गुरे बांधत असताना अचानक रानटी डूकराने हल्ला केला यात शेतकरी  गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील खडसंगी येथे शुक्रवारी साय.५.३०च्या दरम्यान घडली.   रामेश्वर तराळे (५२)  असे शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर तराळे हे आपल्या शेतात काम आटोपून गुरे बांधत असताना दबा धरून बसलेल्या रानटी डुकराणे त्यांच्या वर हल्ला चढवून गंभीर जखमी केली.त्यांनी आरडा ओरड केली बाजूंच्या शेतकऱ्यांनी त्यांचा बचाव केला.त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र खड संगी येथे दाखल केलं.प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.

error: Content is protected !!