Home सामाजिक कब्बडी खेळ युवकांना नवसंजीवनी देणारा खेळ : डाँ गोपीचंद गजभे

कब्बडी खेळ युवकांना नवसंजीवनी देणारा खेळ : डाँ गोपीचंद गजभे

1323

खांबाडा येथे कबड्डी स्पर्धा

नेरी : कबड्डी हा खेळ ग्रामीण क्षेत्रातील युवकांसाठी नवसंजीवनी देणारा खेळ असून या खेळातुन युवकांचे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास साधला जाऊन शरीरयष्टी सुदृढ होते. आणि युवक हे जीवनात अनेक स्पर्धात यशस्वी होऊन अनेक भरती साठी पात्र ठरत असतात असा हा युवकांचा व्यक्तिमत्त्व फुलवणारा खेळ आहे. असे प्रतिपादन डाँ गोपीचंद गजभे यांनी राष्ट्रसंत युवा क्रीडा मंडळाच्या सौजन्याने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात केले.

.         नेरी जवळील खांबाडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन सोहळा संपन्न होऊन सामन्यांना सुरवात झाली. या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून डाँ गोपीचंद गजभे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संदीप पिसे, सभापती कु उ बा समिती चिमूर मंगेश धाडसे, मान्यवर म्हणून उपस्थित होते. आमदार प्रतिनिधी म्हणून संदीप पिसे उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार 2024 प्राप्त केल्याबद्दल डाँ गोपीचंद गजभे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी खेडाळूना मार्गदर्शन केले या स्पर्धेला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक आ बंटी भांगडीया यांचेकडून देण्यात येणार आहे तर इतर अनेक आकर्षक बक्षीस विनोद बारसागडे यांच्याकडून देण्यात येणार आहे.

.         याप्रसंगी प्रामुख्याने सामाजीक कार्यकर्ते रवि चौधरी, व्यवस्थापक आदि. वि. का. सह. संस्था विनोद बारसागडे खांबाडा, सामाजीक कार्यकर्ता अमोल गजभे, मधुकर पडाल, बुथ अध्यक्ष गोपाल जिवतोडे, संदीप चौखे, सुनिल कडवे, पोलिस पाटिल संजय गायकवाड, रामभाऊ चौखे, देवेंद्र नन्नावरे, वासुदेव भरडे, चेतन गायकवाड, मनोज शेरकूरे, तसेच मोठया संख्येने युवा वर्ग तथा समस्त ग्रामवासी उपस्थिती होते.

error: Content is protected !!