Home विदर्भ निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

1444
  • ५० जनावरांची सुटका : ५ मृतावस्थेत 
  • ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त
  • चालक फरार 

वरोरा

.        ट्रक मध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलाच्या युवकांनी व वरोरा पोलिसांनी वरोरा शहरातील रत्नमाला चौक येथे शनिवारी दुपारच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये जवळपास ५५ जनावरे होती. यातील ५ जनावरे मृतावस्थेत आढळली असून चालक मात्र ट्रक सोडून फरार झाला आहे.

.        प्राप्त माहिती नुसार बजरंग दल वणी आणि वरोरा यांना गुप्त माहिती मिळाली की एमपी मधून गो तस्करी घेऊन एक ट्रक नागपूर वरून वणी-वरोरा मार्गे तेलंगणात जाणार अशी माहिती मिळाली असता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर माहिती पोलीस स्टेशन वरोरा यांना दिली आणि संयुक्त गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई केली. नागपूर कडून चंद्रपूर कडे एम एच 40 सीएम3203 या क्रमांकाचा ट्रक मध्ये मध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक वरोरा शहरातील आनंदवन चौक येथून जात असताना बजरंग दलाच्या युवकांना दिसला त्याचा पाठलाग करीत वरोरा वाहतूक पोलीसाच्या मदतीने रत्नमाला चौका नजीक चालकाने ट्रक थांबविला चालक व वाहक पळून गेले या ट्रकमध्ये 55 बैल होते. ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. ट्रकमध्ये गुदमरून पाच जनावराचा मृत्यूही झाला. नागरिकांच्या मदतीने जनावरांना ट्रकबाहेर काढण्यात आले. चंद्रपूर नजीकच्या लोहारा येथील गोरक्षण संस्थेमध्ये बैल पाठवण्यात आले. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साठम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव हे करीत आहे

error: Content is protected !!