नगर पालिकेचे दुर्लक्ष
अतिक्रमणधारक व ट्रॉन्सपोर्ट धारकांची मनमानी
पार्किंगचा पत्ता नाही, : हातगाड्यांचे अतिक्रम
व्यथा दुर्लक्षित शहराची भाग – 3
मारोती चाफले
गडचांदूर : भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाडयांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेय पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते, अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे संपूर्ण रस्तेच गिळ्कृत केले आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
. गडचांदूर शहराची रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सुज्ञ नागरिक सांगतात. शहरात दोन मुख्य रस्ते आहेत, या दोन्ही मुख्य रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी बाजारपेठ आहेत, केवळ १५ फुटाचे दोन्ही रस्ते असल्यामुळे ग्राहकांना स्वतःचे वाहन उभे करण्याकरीता जागा उपलब्ध राहत नाही, अशावेळी बाईक रस्त्यावर पाहन पार्किंग करतात. येथेच हातगाड्याही उभ्या केल्या जातात, त्याचा त्रास पादचारी व वाहनधारकांना होतो. या मुख्य सत्यावर विरुद्ध दिशेने एकाचवेळी दूसरे चारचाकी वाहन आल्यास अनेकदा वाहतूकीचा खोळंबा होतो.
. गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, दालमिया सिमेंट व अंबुजा असे चार सिमेंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्व वाढविण्यात कारखान्यांचा मोठा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक येथे रोजगारासाठी वास्तव्यास असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणा-या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
. सिमेंटची वाहतूक करण्याकरीता गडचांदूर शहरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. कोणत्याही ट्रांस्पोर्ट धारकांनी आपले ट्रक उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते.
स्टेट बॅक परिसरात भरगच्च गर्दी बसस्थानका जवळ भारतीय स्टेट बैंक आहे. बँकेला पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे बँकेचे ग्राहक अगदी रस्त्यावर वाहने उभी करतात. बँकेलाच लागून देशी दारुचेही दुकान आहे. या दुहेरी गर्दीमुळे वर्दळ करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहे . मात्र या समस्या कडे नागरपरिषदचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
अतिक्रमणाची समस्या जीवघेणी गडचांदूर शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर पाहिजे तशा विकासाच्या सुविधा न मिळाल्याने अतिक्रमण समस्यांची तीव्रता प्रचंड वाढली आहे. ठिकठिकाणी अतिक्रमण गाजर गवतासारखे वाढत आहे. वाढत्या अतिक्रमणाला रोखण्यासाठी नगरपरिषदेने धडक मोहिम राबविने आवश्यक असताना स्थापने पासून दहा वर्षाच्या काळात एकदाही राबविली नाही. त्यामुळे काही नागरिकांनी पॅनल सारखे पक्के अतिक्रमण रस्त्यावरच थाटल्याचे चित्र गडचांदूर शहरात जागोजागी निदर्शनास येते.
पोलीस विभागाची मेहरबानी राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट हा रास्ता गडचांदूर शहरात करण्याच्या मुख्य मार्ग आहे. रस्त्यावरील वाहनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला, मात्र अवैध पार्किंगवर आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची पोलिसांमध्ये इच्छा शक्तीच दिसून येत नाही. माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात, याच मार्गावरुन शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या वाहणामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यंत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नगरपरिषद व पोलिसांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी स्विकारुन अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांचा कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकान्यांचे उदासीन धोरण दूर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
मुख्य मार्गावर वाहतुकीची अशी कोंडी निर्माण होते. शिवाजी मार्केट प्रमुख बाजाराचे ठिकाण असून रस्ते हात गाडीवाल्यांनी व्यापलेले आहेत. पार्किंग झोनही अस्तित्वात नाही. त्यामुळे या ठिकाणी बेशिस्तपणाचे दर्शन होते, याठिकाणी हजारो विद्यार्थी संख्या असलेला महात्मा गांधी विद्यालय आहेत. त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. गडचांदुरात विविध भागातील वस्तीत मोठमोठे रस्ते आहेत, मात्र आवश्यक त्या वर्दळीच्या ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने अनेकदा वाहन चालकांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी नगर परिषदेने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.