शारदा नागापुरे यांना गोल्डन अवॉर्ड देउन सन्मानित

24

वरोरा : येथील शारदा प्रमोद नागापुरे यांना 2022-23 या आर्थिक वर्षांत विमा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बद्दल वरोरा येथील भारतीय जीवन विमा निगम वरोरा शाखेच्या वतीने त्यांना उत्कृष्ट विमा अभिकर्ता म्हणून सन्मानित करण्यात आले.

शारदा प्रमोद नागापुरे या मागील अनेक वर्षांपासून भारतीय जिवन विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात शारदा प्रमोद नागापुरे यांनी 71 पॉलिसी व 10 लाख नॉन सिंगल प्रीमियम करून गोल्डन क्लब अवॉर्ड देऊन शाखा प्रबंधक मोहन गोगुलवार, सेल्स मॅनेजर सुनील बिझवे, विकास अधिकारी सचिन उघडे यांनी गोल्डन क्लब अवॉर्ड ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सहपरीवार सन्मानित केले. हा कार्यक्रम 13 जानेवारी ला वरोरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालय, वरोरा येथे पार पडला, यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक विमा प्रतिनिधी ना सन्मानित करण्यात आले.