Home सामाजिक दिव्यांग मतदारांना लोकशाही बळकटीकरण व पारदर्शक निवडणूकीचे मार्गदर्शन 

दिव्यांग मतदारांना लोकशाही बळकटीकरण व पारदर्शक निवडणूकीचे मार्गदर्शन

1430

वरोरा उपविभागीय कार्यालयाचा उपक्रम

वरोरा : वरोरा विधानसभा मतदार संघात “राष्ट्रीय मतदार दिनाचे” औचित्य़ साधुन वरोरा तालुक्यातील संधिनिकेतन आनंद निकेतन येथे स्थित दिव्यांगाची कर्मशाळा येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे अध्य़क्षतेखाली प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहिभागी करुन, लोकशाही बळकटीकरण व पारदर्शक निवडणूकीचे तत्व़ व आगामी निवडणूकीमध्ये सहभाग नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

.        आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथे राष्ट्रीय मतदार दिनांचे अनुषंगाने रांगोळी स्प़र्धे चे आयोजन करुन, विजेत्या उमेदवरांना पारीतोषीक प्रदान करण्यात आले. तसेच वरोरा तालुक्यातील आनंद निकेतन महाविद्यालय, हिरालाल लोया कनिष्ठ़ विद्यालय, व लोकमान्य़ महाविद्यालय, वरोरा येथे राष्ट्रीय मतदार दिनांचे अनुषंगाने शपथ विधीचे आयोजन करुन, विद्यालयीन / महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी व्दारे मतदार दिनांची शपथ घेण्यात आली. तसेच 75- विधानसभा मतदार संघातील संपुर्ण एकुण 339 मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे व्दारे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

.        स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान यंत्र जनजागृती मोहिमे अंतर्गत वरोरा तालुक्यातील सर्व गावामध्ये चलचित्र दाखवुन व EVM, VVPAT मशिन व्दारे मतदान करण्याबाबत प्रोत्साहीत करुन, मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आले. व मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत आव्हाणीत करण्यात आले.

error: Content is protected !!