अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा बसवाहक पोलिसाच्या जाळ्यात

29

गडचांदूर

.         नवव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या विवाहित एसटी बस वाहका विरुद्ध गडचांदूर पोलिसात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

.         जिवती तालुक्यातील पाटण येथील एक १४ वर्षाची विद्यार्थी गडचांदूर येथील एका शाळेत नवव्या वर्गात शिकत आहे. ती पाटण ते गडचांदूर असा प्रवास दररोज एसटीने करायची. या एसटी बस वर वाहक म्हणून असलेला मुनीर सादिक शेख रा टेकार मांडवा हा तिच्या सोबत नेहमी बोलत असल्याने त्यांची ओळखी वाढली. काही दिवसानंतर मुनीर ने तिला प्रपोज केले. मात्र त्या विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र शाळेत एसटी बसने येणे जाणे करावे लागत असल्याने दोघात पुन्हा बोलचाल व्हायची म्हणून तिने त्याला होकार दिला.

.         होकार दिल्या नंतर तो तिला भेटासाठी शाळेकडे दुचाकी घेऊन येऊ लागला. दि. १० ला दुपारी लवकर सुट्टी झाली आणि तो शाळेजवळ दुचाकी घेऊन तिची वाट पाहत उभा होता. शाळेला सुट्टी होताच ती त्याच्या दुचाकी वरून हातात हात घालून दोघेही विसापूर मार्गे जात असल्याचे गावातील नागरिकांना दिसलें. याबाबत मुलीच्या आईला माहित होताच गडचांदूर पोलीस गाठून माझ्या एक विवाहित पुरुष माझ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने करताच आरोपी मुनीर सादिक शेख (३२) याला अटक केली असुन त्यांचेवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. असुन पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.