कोतवालावर प्राणघातक हल्ला

89

संशयित आरोपीला अटक

नागभीड

.         दुचाकीने स्वगावी नवानगर येथे जात असताना बाळापूर ते देवापायली या दोन गावांच्या मधोमध  अज्ञात इसमानी धारधार अवजाराने वार केला. यात कोतवाल संजय रहाटे हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारला सायंकाळी 6.30 ते 7 वाजताच्या दरम्यान घडली.

.         नागभीड तालुक्यातील बाळापूर साजा येथील कोतवाला संजय गजानन रहाटे (40) हे  गंभीर जखमी अवस्थेत रहाटे यांनी गाडी चालवत देवापायली पर्यंत आणली आणी देवापयली येथे पोहचतात ते गाडी सह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.. नागरिकांनी त्यांच्या कडे धाव घेतली असता ते गंभीर स्वरूपात जखमी दिसले. लागलीच नागरिकांनी नागभीड पोलिसांना घटनेची माहिती देत रहाटे यांना नागभीड ग्रामीण रुग्णालायत दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले. यात त्यांच्या पाठीला खोलवर जखम झालेली आहे. पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा केलेला असून घटनेचा तपास केला असता फिर्यादीने दोन दुचाकी स्वारांनी मागून हल्ला केल्याचे सांगितले. तसेच आवाजावरून तलाठी ऑफिस च्या जवळ घर असलेले व्यकीचे नाव सांगितले.

.          त्यानुसार पोलिसांनी कारवाही करीत बाळापूर येथील संशयित  आरोपी नामे मंगेश झाडे (38) याला अटक केलेली आहे.. व सदर आरोपीवर कलम हत्येचा प्रयत्न व दोन व्यक्तीचा सहभाग  307,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे…. घटनेचा तपास ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक कुंभरे करीत आहेत…!!!