Home सामाजिक सर्वोदय महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.राजेश डहारे

सर्वोदय महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.राजेश डहारे

1415

सिंदेवाही 

.           विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही द्वारा संचालित सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील  कार्यकारी प्राचार्य पदी म्हणून डॉ. राजेश डहारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

.           डॉ राजेश डहारे हे मागील ३५ वर्षा पासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यानी १८ रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित केलेले आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्यानी पी.एच. डी. ची पदवी सुद्धा मिळवली आहे. डॉ डहारे यांनी क्वालालंपूर मलेशिया, तसेच कोलंबो श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय संमेलनात अध्यक्ष पद व ज्युरी पदांवर कार्य केलेले आहे.तसेच भारतामध्ये विजयवाडा, आंध्रप्रदेश तसेच चंद्रपूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष व ज्युरी मेंबर म्हणून काम केले आहे जवळपास ३० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कान्फरंस मध्ये भाग घेतला आहे. डॉ. डहारे यांना भारत सरकारच्या  वित्त विभागाने तीनदा बेस्ट इन्कम टॅक्स रिटर्न पर्सन म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांना पांडेचेरी येथे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले आहे.

.           डॉ. डहारे यांनी विविध १७ देशांना भेटी दिल्या आहेत. सर्वोदय महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जैस्वाल, सचिव अरविंद  जैस्वाल, मनोहर नन्नावरे, विनायक सोणवाने , यांचे डॉ. डहारे यांनी आभार व्यक्त केले , तर महाविद्यालयातील डॉ नागलवाडे, डॉ मदारे, डॉ शेख, डॉ दिलीप सोनवणे,   डॉ रामदास कामडी ,डॉ माधव वरभे, डॉ जनबंधू मेश्राम,  प्रा उके, आडे, रनदीवे, गभने, बोरकर तूमराम, नितीन सांगुळले, भैय्या नागोसे, व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ.राजेश डहारे यांचे  अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!