Home सामाजिक ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था सावित्रीबाई फुले जयंती साजरी

1553

गडचांदुर

.          ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था कोलाडी/नंदप्पा द्वारा आयोजित क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त “महिला सबलीकरण काळाची गरज”   या विषयावर मार्गदर्शनपर दि. 3 रोज बुधवार ला ठीक 10.00वा.कार्यक्रम ग्राम पंचायत नंदप्पा येथे आयोजित करण्यात आला.

.          दिप प्रज्वलित करून सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत समारंभानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा नंदप्पा व प्रांजली महा विद्यालय नंदप्पा येथील विद्यार्थिनींनी आपले सुंदर मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक पुरोगामी विचार मंच संयोजक कोरपना प्रभाकर गेडाम यांनी महिला सबलीकरनावर विचार प्रगट करून पुरोगामी समाज  व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले व आजचे स्त्रियांचे जीवन  व शासनाच्या मुलींच्या शिक्षना विषयी योजना यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक पी . ए. सोयाम प्रांजली विद्यालय नंदप्पा येथे सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आजची स्त्री मुक्ती ,स्त्रियांनी आत्मनिर्भर कसे व्हायचे याविषयी आपले विचार व्यक्त केले.

.          कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था चे संस्थापक  शंकर देवाळकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती  व समाजात अश्या महान व्यक्तीच्या विचारांची गरज समाजाच्या काना कोपऱ्या पर्यंत पोहचवून समाज जागृत होतील असे प्रतिपादन केले.

.          कार्यक्रमाचे प्रमुख अथिती म्हणून ग्राम पंचायत नंदप्पा सरपंच कर्णू उदे,  उपसरपंच गणेश कदम, मुख्याध्यापक सुनील राठोड, मुख्याध्यापक देविदास चीतगिरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कविता जाधव, पोलिस पाटील रावसाहेब घुगुल, ग्राम  पंचायत व गट ग्राम पंचायत पदाधिकारी पांडुरंग शिंदे, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय नंदप्पा, प्रांजली विद्यालय नंदप्पा येथील विद्यार्थी महिला नागरिक उपस्थित होते.

.          कार्य क्रमाचे प्रास्ताविक संकलन सूत्रसंचालन प्रा.संतोष पोडे सर तसेच आभार प्रदर्शन श्री संतोष झाडे यांनी केले या कार्यक्रमाला 400ते500नागरिकांची उपस्थिती होती अल्फहार देऊन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री संजय शिंदे व आश्रमाच्या सेवकांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!