वरोरा
. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, वरोरा च्या वतीने, ३ डिसेंबर रजी सकाळी ९ वाजता अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम बोर्डा, वरोरा येथे भारतीय चक्रवर्ती सम्राट, अजिंक्ययोद्धा महाराजा यशवंतराव होळकर याची जयंती साजरी करण्यात येत आहे व विधान भवनावर विशाल मोर्चा संदर्भात बैठकी चे आयोजन केलेले आहे. या जयंतीला व बैठकीला नागपूर येथून धनगर समाज पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
. तरी समस्त वरोरा तालुक्यातील धनगर समाज बांधव आणि भगिनींनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन अहिल्यादेवी उत्सव समिती, वरोरा च्या वतीने करण्यात येत आहे.


