तोहोगाव येथील शेतात जमिनीत पुरविला होता मृतदेह
कोठारी
. चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह तोहोगाव येथील एका शेतकर्याच्या शेतजमिनीत पुरविला होता. शेतातील पाण्याने मृतदेहाचा हात जमिनीच्या वर आल्याने नागरिकांच्या लक्षात येताच मृतदेह जमिनीच्या बाहेर काढण्यात आला मात्र सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख उशिरा पटली. पत्रु वलसू टेकाम ( ४५) रा, पाचगाव असे मृतक बेपत्ता इसमाचे नाव आहे.
. गोंडपिपरी तालुक्यांतील पाचगाव या गावातील पत्रु टेकम यांची मानसिक संतुलन बिघडल्याने तो १९ नोव्हेंबर ला रात्रौ २ वाजताच्या सुमारास घरून निघून गेला होता. त्याचा शोधा शोध नातेवाईकांनी सुरू केला पण तो कुठच सापडत नव्हता. गिरीधर धोटे यांचे शेतात प्रेत गाळले गेले असल्याची कुजबुज गुरुवारला नातेवाईकांना समजतात धोटे यांच्या शेतात जाऊन नातेवाईकांनी संपूर्ण शेत पिंजून काढले असता कापसाच्या शेतात प्रेत गाडलेले असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली. कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, गोंडपीपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून गाडलेले प्रेत बाहेर काडले. नातेवाईकांकडून प्रेताची ओळख पटवून पंचनामा केला. प्रेत अति कुजलेले असल्याने तिथंच शवविच्छेदन करण्यात आले. कोठारी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे व मंडळ अधिकारी प्रशांत बैस उपस्थित होते. वृत्त लिहिपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.
. शेत शिवारात वन्यप्राण्यांचा हौदोस असून शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे व पिके जंगली डुकर फस्त करीत असल्याने शेतकरी पिकांच्या सौरक्षण करण्याच्या दृष्टीने झटका मशीन किंवा विद्युत प्रवाह लावीत असते. त्याच विद्युत प्रवाहाने पत्रु चा मृत्यू झाला असावा असा संशय गावकरी व्यक्त करीत आहे. बिग फुटू नये म्हणून त्या मृतदेहा ला जमिनीत कोणीतरी पुरविले असल्याचे पण बोलल्या जात आहे. या घटनेमुळे तोहोगावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासाअंती घटनेचा उलगडा होईल.

