अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देऊ नये

31

 आफ्रोट संघटनेचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

सिंदेवाही 

.           अनुसुचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे किंवा ते अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचान्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबत नुकतेच आफ्रोड तालुका संघटना सिंदेवाही मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

.           संद‌र्भिय शासन पत्र दिनांक १०//११/२०२३ अन्वये अधिसंख्य पदावरील कर्मचान्यांना ११ महिल्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वेतनवाढ अनुदेय नाही यावरुन अभिसंख्य पदावरील वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबत संघटनेची धारणा पक्की झाली आहे. करीता अशा अधिसंख्य पदावर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबतचे निवदेन दिनांक २१/११/२३ ला सिंदेवाही तालुका अध्यक्ष आफ्रोड संघटना यांचे वतीने जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तहसीलदार यांचे मर्फतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू ताडाम, मंगलदासजी मेश्राम, सल्लागार तालुका शाखा सुनील उईके, दिपक म्हैस्कर, केवलदास गेडाम, प्रमोद कोवे व ईतर निवेदन देताना उपस्थित होते.