शिवदूत व बुथ प्रतिनिधीना मिठाई वाटप

50

  जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची दिवाळी भेट 

चंद्रपुर 

.           येथील वरोरा विधानसभेतील भद्रावती शहराच्या शाखा, शिवदूत व बुध प्रतिनिधीना मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व किरण पांडव यांचे सूचनेनुसार तसेच दत्तात्रय पैईतवार संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंद्रपूर तथा पप्पू सरवण शहर प्रमुख भद्रावती, राजू सारंगधर माजी नगरसेवक यांचे समवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठवलेली मिठाई व दिवाळीचा फराळ वाटप केला.

.           तसेच मनिष बूच्चे उपशहरप्रमुख गौराळा विभाग यांचे निवासस्थानी शाखाप्रमुख प्रथम गेडाम व गौराळा शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिकांना मिठाई वाटप केली व मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याविषयी माहिती दिली . .कल्पना भुसारी महिला उपजिल्हाप्रमुख वरोरा विधानसभा क्षेत्र,  तृप्ती हिरादेवे शहर प्रमुख महिला आघाडी भद्रावती, मीनल आत्राम माजी नगराध्यक्ष भद्रावती यांनी नितीन मत्ते यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली व मत्ते यांनी त्यांना भाऊबीजेची भेट दिली त्यानंतर नितीन मत्ते यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अमित गुंडावार, सुनिल नामोजवार, प्रशांत डाखरे यांची सुद्धा भेट घेऊन मिठाई वाटप केली.

.            त्यानंतर शेवटी आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर यांचे निवासस्थानी भेट देऊन ठेंगणे परिवारांना मुख्यमंत्री यांनी पाठवलेली भेट मिठाई दिली त्यावेळी ठेंगणे परिवारातर्फे डॉक्टर प्रभाकर ठेंगणे, आशिष ठेंगणे, संदीप ठेंगणे यांनी नितीन मते यांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच पप्पू सरवण शहर प्रमुख भद्रावती यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी दिलीप झाडे व जीतू आसेकर उपस्थित होते