विद्यार्थ्यांना संस्कारित शिक्षण देणे काळाची गरज

25

◾ शिक्षणामधून संस्कार कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुन्ह्यात वाढ 

 महेंद्र कोवले 
  सिंदेवाही 

.           मुले ही देवाघरची फुले आहेत. असे सर्वच स्तरावरून आपण ऐकत असतो. मात्र अलीकडे शिक्षणामधुन विद्यार्थ्यांवरील संस्कार कमी झाले असल्याने अनेक विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळत असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यात दिसून येत असून विद्यार्थ्यांना संस्कारित शिक्षण देणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

.           सध्याचे शिक्षण हे दोन प्रकारचे झाले आहे. एक गरीब आणि मध्यमवर्गीय, तर दुसरा श्रीमंत वर्ग गरिबांची व मध्यमवर्गीयांची मुले मुली सरकारी शाळेत शिकतात. तर श्रीमंतांची मुले महागड्या अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकतात. मात्र आता दोन्ही ठिकाणी शिक्षणाची जीवघेणी स्पर्धा घेणे सुरू आहे . टक्केवारीच्या प्रयत्नात घोकमपट्टी मुळे विद्यार्थी अभ्यासात चांगला हुशार असेल तर टिकतो, मात्र ज्या विद्यार्थ्यांना ही स्पर्धा कठीण जाते. ते विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. शिक्षण सोडून तो वाम मार्गाकडे वळत आहे. सध्या सिंदेवाही तालुक्यात अल्पवयीन मुला मुलींचे अनैतिक संबंध हा प्रकार खूपच वाढलेला आहे. मागील महिन्याभरात सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अनैतिक संबंध बाबत तक्रारी पाहून समाजमन हेलावून गेले. तर अनेकांचे पालक चक्रावून गेले आहेत. या घटनांमध्ये काही मुली मुले शाळकरी आहेत, तर काहींनी शाळा सोडलेली आहे. या प्रकरणात मुलींची शाळा सुटते.

.           समाजात बदनामी होत असते. त्यामूळे अनेक पालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मुले सुद्धा या प्रकरणात पुढे असून अनेक मुलांवर पास्को सारखा गुन्हा दाखल होत असल्याने त्या मुलांना समाजात एक गुन्हेगार म्हणून जगावं लागत आहे. त्यामुळे पुढे चालून मुले खून, बलात्कार, चोरी, तस्करी, अशा गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळतो. मुले मुली गुन्हेगारी प्रवृत्ती कडे का वळत आहेत. यांचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला ,तर असे लक्षात येते की, पूर्वी समाजातील मुले मुली वाईट मार्गाने जात असल्यास अशा मुला मुलींना समाजातील लोक टोकत होते. मात्र आताची मुले मुली असंस्कारक्षम असल्याने त्यांना अशा वाईट गोष्टी बाबत टोकले तर ते त्यांच्यावर उलटतात. त्यामुळे आता समाजात वाईट गोष्ठी दिसत असल्या तरी त्याकडे सज्जन व्यक्ती दुर्लक्ष करतो.

.           तसेच दुसरे कारण असे की, आजच्या मुलामुलींच्या हातात असलेला मोबाईल फोन. सोशल मीडियावर राहून आजचे मुले मुली नको त्या वाईट गोष्टी पाहून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल मध्ये काय बघत असते, यांचे पालकांना काहीच माहीत नाही. यासाठी खरे दोषी तर पालकच आहेत. कारण अल्पवयीन मुलामुलींना महागडे मोबाईल फोन घेऊन देतो. आणि त्याला खर्चासाठी पैसे सुद्धा देत असतो. हेच कारण त्यांच्या बिघडण्यास कारणीभूत ठरीत आहे. तिसरे महत्त्वाचे कारण असे की, अवघड गावाचे अवघड दुखणे, शाळेत वर्ग चार असतात. मात्र शिक्षक दोनच असतात. दोन शिक्षक दोन वर्गाना शिकवणार.

.           मग दोन वर्ग वाऱ्यावर राहणार. मग मुले काय शिकणार? त्यातही शिक्षकांना अनेक प्रकारच्या सर्व्हे साठी माहिती गोळा करण्यासाठी गावात फिरावे लागते. अशा वेळी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा विद्यार्थी शिक्षणापासून दूर दूर जात असतो. आणि त्याचा परिणाम त्याच्या एकूण टक्केवारीवर पडतो. तेव्हा असे विद्यार्थी पुढे टिकत नाही. आणि मग हळूहळू शाळेकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. आणि पुढे तो शाळा सोडून वाम मार्गाकडे वळण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे आणि संस्कारित शिक्षण देणे काळाची गरज निर्माण झाली आहे.