Home सामाजिक ३ रे ओपन जिल्हा स्तरीय खुले तायक्वांडो स्पर्धेत वरोरा तायक्वांडो असोसिएशनचे यश. 

३ रे ओपन जिल्हा स्तरीय खुले तायक्वांडो स्पर्धेत वरोरा तायक्वांडो असोसिएशनचे यश.

1558

वरोरा : ३ रे ओपन जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत २०२४, तायक्वांडो असोसिएशनच जिल्हा चंद्रपूर व्दारे आयोजित डि.के. तायक्वांडो असोसिएशन सिंदेवाही च्या वतीने चंद्रपूर जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत २०२४ घेण्यात आले. या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने तायक्वांडो असोसिएशन वरोराच्या टिम ने सर्वाधिक यश मिळाले आहे.

.      त्यात सुवर्ण पदक खुशी किन्नाके, विधी भोगेेकर, कास्यपदक कनक सावसाखडे,  विर निखाडे, संस्कार वारे, वरद झाडे, वस्तिक वारे, युगांत भांडकर, रजत पदक समंथा ताजणे, अर्निका मडावी, कावेरी किन्नाके,  स्वरीत पाटील अशा ऐकून १२ खेळाडू नी यश मिळविले आहेत.

.      या सर्व खेळाडू ना प्रशिक्षण देणारे अक्षय हनुमंने यांचाही विशेष मोलाचा वाटा आहे. सदर विद्यार्थी आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर सदैव तायक्वांडोची तयारी करत असतात याकरिता सर्व खेळाडूचे, तायक्वांडो प्रशिक्षकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख तानाजी बायस्कर, आयोजक मान्यवरांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!