विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लाभणार उपस्थिती
चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समिती, नंदोरी बु. यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज रविवार ३१ मे २०२६ ला साजरी करण्यात येत आहे. हा सोहळा सकाळी १० वाजता नंदोरी बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर आयोजित करण्यात आला आहे.
आमदार देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
या भव्य जयंती सोहळ्याचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती धनराज विरुटकर भूषविणार आहेत.
मान्यवरांची मांदियाळी
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन सदस्य वामन तुर्के, माजी सभापती प्रवीण ठेंगणे आणि सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे उपस्थित राहणार आहेत.
. तसेच प्रशासक तथा माजी सरपंच मंगेश भोयर, माजी उपसरपंच उषाताई लांबट, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशितोष घाटे, माजी सरपंच सुधाकर रोहणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम ढवस, दैनिक नवजीवनचे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, देवराव आस्कर, तलाठी रविंद्र लोंढे आणि शिक्षक लोंढे यांचीही उपस्थिती असेल.
. याशिवाय महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशउपाध्यक्ष वासुदेव आस्कर, जिल्हाध्यक्ष रमेश बुच्चे, निळकंठ अवगान, रामकृष्ण मोंढे, रामभाऊ अवगान आणि नागोजी चामाटे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समिती, नंदोरी बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.


