Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतातील कोठ्याला भीषण आग

शेतातील कोठ्याला भीषण आग

51

१ लाख ५० हजारांचे साहित्य जळून खाक

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील घटना

अग्निशमन दल आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे आज रविवार दि. 24 मे ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतातील कोठ्याला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. ही आग संदीप विठ्ठल लांबट या शेतकऱ्याच्या शेतातील कोठ्याला लागली असून, यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे शेतीचे साहित्य आणि अवजारे जळून खाक झाले आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान

या भीषण आगीत कोठ्यात ठेवलेले शेतीशी संबंधित संपूर्ण साहित्य नष्ट झाले. यामध्ये ३२ स्प्रिंकलर तोट्या, १५ खताच्या बॅग, ३ पाण्याचे ड्रम, शेताच्या कुंपणासाठी आणलेल्या ४०० खुंट्या, सौर ऊर्जेवर चालणारे कुंपणाचे तार, नांगर आणि वखर यांचा समावेश आहे. या आगीत आपले अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकरी संदीप विठ्ठल लांबट यांनी सांगितले.

गावकऱ्यांची धाव अन् प्रशासकीय मदत

आग लागल्याचे समजताच नंदोरी येथील ग्रामस्थांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सुरुवातीला शेतातील बोरवेलच्या पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती वरोरा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीने तात्काळ घटनास्थळी पोहोचून धगधगती आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

.          घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

error: Content is protected !!