Home चंद्रपुर जिल्हा विशेष हत्याकांडातील आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी

हत्याकांडातील आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी

10

विधिसंघर्ष मुलाने सांगितला मृतकाचा ठावठिकाणा

विसापूर येथून मिळाली आरोपींना सहकार्याची चर्चा

बल्लारपूर : बल्लारपूर येथील किल्ला वॉर्ड मधील विराज राजेश आगधारी (१७) हा तरुण विसापूर येथे आला आहे. येथील तुकडोजी महाराज चौकालगत असलेल्या एका सलून मध्ये आहे. असी खात्री देणारी माहिती विसापूर येथील एका विधिसंघर्ष मुलाने आरोपींना दिल्याची चर्चा चालू आहे. या माहितीच्या आधारे आरोपी दुचाकी वाहनाने विसापूर येथे दाखल झाले.त्यांनी पहिल्यांदा धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर भर रस्त्यावर विराज ला गाठून दगडाने त्याला जीवानिशी संपवले.या खुनी थराराने गावात दहशत निर्माण झाली.याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपींना जेरबंद केले. जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींनी तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

.       बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे शुक्रवार (दि. १५) मे रोजी  संध्याकाळी साडेसहा वाजता विराज राजेश आगधारी (१७) याचा निर्घृण हत्या करुन आरोपींनी काटा काढला होता. याप्रकरणी आरोपी मोनू ऊर्फ रौनक सुखपाल निषाद (१९),आकाश रामकरण निषाद (२१), जिशान शरीफ सिद्दीकी (१९), समीर कलीम खान (२१) व एका विधी संघर्ष बालकासह पाच आरोपींना सर्व राहणार बल्लारपूर यांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आरोपींना विसापूर येथील एका विधी संघर्ष मुलाने विराज विसापूर येथे असल्याची माहिती घटना घडण्यापूर्वी दिल्याची चर्चा केली जात आहे. त्याचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून त्याद्वारे पोलीस तांत्रिक दृष्टीने तपास करत असल्याची माहिती आहे.

.        या गुन्ह्यात सहभागी तरुणांच्या वयाचा विचार केला असता, खेळण्याबाळगण्याच्या वयात गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांचे पालक या प्रकारामुळे हतबल होत आहे. भविष्याचा विचार करण्याऐवजी तरुण पिढी गुंड प्रवृती जोपासत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे. याला कारणीभूत अल्पवयात वाढती व्यसनाधीनता असल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेचा सखोल तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात केला जात असून विसापूर येथील कोणाचे तार आरोपींसोबत जुडले आहे. या दिशेने मागोवा घेतला जात आहे.

error: Content is protected !!