Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापुरातील हत्याकांड प्रकरणात पाच आरोपींना अटक

विसापुरातील हत्याकांड प्रकरणात पाच आरोपींना अटक

8

सर्व आरोपी बल्लारपूर येथील रहिवासी

तीन महिन्यापूर्वींच्या आपसी वादातून घडले हत्याकांड

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात तीन महिन्यापूर्वी विसापूर येथील गुंडाच्या टोळीने हत्या केलेल्या विराज राजेश आगधारी व आरोपी मध्ये आपसी वाद झाला होता. या वादाच्या वचप्यातून शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास विसापूर येथे रेल्वे चौका लगत भर रस्त्यावर विराज ची हत्या करण्यात आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह पाच आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली. मृतक विराज व त्याचे मारेकरी बल्लारपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

.       बल्लारपूर येथील विराज राजेश आगधारी (१७) हा युवक शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता दरम्यान विसापूर येथील एका हेअर सलून मध्ये आला होता. तुकडोजी चौक मध्ये तो आला असता आरोपींनी त्याचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र विराज ने तेथून पळ काढला. दुचाकी वाहनाने आलेल्या आरोपींनी त्याचा सिनेस्टाइल पाठलाग केला. त्याचेवर खंजर आणि तलवार शस्त्राने हल्ला केला. हल्ला चुकवत तो रेल्वे चौक ते सुरभी चौक दरम्यान रस्त्याने धावत सुटला. नेमक्या त्याच वेळी अली शेख यांच्या दारासमोर फाटकाजवळ जवळ आरोपींच्या जाळ्यात विराज अटकला. त्याचेवर आरोपींनी एका मोठ्या दगडाने प्रहार करुन ठार केले.

.      त्याला ठार करून आरोपींनी दुचाकी वाहनाने विसापूर येथून पळ काढला. ते सर्व आरोपी नागपूर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपी मोनू ऊर्फ रौनक सुखपाल निषाद (१९), आकाश रामकरण निषाद (२१), जिशान शरीफ सिद्दीकी (१९), समीर कलीम खान (२१) व एक विधिसंघर्ष मुलगा असे एकूण पाच आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काल शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक आयुष निपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या प्रकरणात आरोपींना जेरबंद करण्यासाठी बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांनी तातडीने तीन पथके गठीत केले होते. पोलिसांनी तातडीने आरोपींना पकडण्यासाठी उपाययोजना केल्याने विसापूर येथील हत्याकांडातील आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

error: Content is protected !!