वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात नवीन टीम सज्ज
भद्रावती शहरात बहुजन समाज पार्टीची नवीन संघटनात्मक बांधणी
भद्रावती : बहुजन समाज पार्टी (बसपा) कार्यालय भद्रावती येथे शनिवार, १६ मे रोजी पक्षाच्या भद्रावती शहर कार्यकारणीचे अधिकृत गठन करण्यात आले. ही कार्यकारणी अधिवक्ता भूपेंद्र रायपूरे, विधानसभा प्रभारी मिलिंद शेंडे, विधानसभा प्रभारी विकास दुर्योधन, विधानसभा अध्यक्ष हरिऔंध भारती, बसपा नेते अजय लिहीतकर आणि बसपा नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली.
. या नवीन शहर कार्यकारणीमध्ये विविध पदांवर सक्रिय कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शहर उपाध्यक्षपदी अजिंक्य बुरनुले व सचिन चालखुरे, शहर महासचिवपदी शब्बू ताई रामटेके, तर शहर सचिव म्हणून अमूर्त भालेराव, कुलदीप लोणारे, संतोष सिडामे आणि प्रतिमा खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच शहराची अतिरिक्त जबाबदारी म्हणून राजेंद्र पाटील आणि नरेंद्र रंगारी यांची शहर प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
. या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने संदीप वालदे, माणिक भालेराव, प्रीता रायपूरे, अशोक जवादे, अवध प्रसाद, सुधीर भारती, नामदेव रामटेके, रवींद्र वानखेडे, मुनेश्वर गौरकार आणि विशाल कांबळे यांचा समावेश होता. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


